views
‘रसायनी’ हे ठिकाण ‘उद्यागांचे शहर’ म्हणून ओळखले आहे. तीन दशकांहून अधिक काळापासून, या शहराला औद्योगिकीकरणाचा वारसा लाभलेला आहे. रसायनीमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाल्यामुळे, शहरात विविध कंपन्यांची स्थापना झाली व औद्योगिकरित्या विकसित झाले. त्यामुळे नोकरीधंदा व रोजगारासाठी येथे लोकांचे स्थलांतरण होण्यास सुरुवात झाली व शहराचा निवासी दृष्टीने देखील विकास होऊ लागला.
रसायनी या उपनगराला नैसर्गिक सुदंरता व हवेशीर परिसराचा वारसा लाभला आहे. तसेच इथे अनेक शाळा, महाविद्यालये अशा शैक्षणिक सुविधांसह रुग्णालये, शॉपिंग मॉल, सुपर मार्केट सारख्या इतर सुविधा ही आहेत, ज्यामुळे ते वास्तव्यासाठी चांगले ठिकाण मानले जात आहे.
रसायनीमध्ये ‘रिअल इस्टेट’ गुंतवणूकीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
रसायनी मधील शिक्षण संस्था:
१. HOC स्कूल इंग्रजी माध्यम
२. पिल्लई H.O.C. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व आर्किटेक्चर कॉलेज.
३. पिल्लई H.O.C. इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च.
४. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल
५. पी.आर.आय.ए. शाळा
६. जे.एच. अंबानी शाळा [इंग्रजी आणि मराठी माध्यम]
७. जनता विद्यालय मोहोपाडा {जेव्हीएम} [इंग्रजी व मराठी माध्यम]
८. NISM {नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट्स}
रसायनीमध्ये स्थित शैक्षणिक संस्थांची ही एक मोठी यादी आहे. शिक्षण आणि त्यानंतर नोकरी धंद्यामध्ये उत्कृष्टतेने वाढ होण्यासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी हे चांगले ठिकाण आहे;.
रुग्णालयेः या ठिकाणी अशी रुग्णालये आहेत ज्यात सर्व प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांसह, चांगल्या प्रतीच्या उपचार सुविधा उपलब्ध आहेत. येथे अंबानी हॉस्पिटल, HOC हॉस्पिटल आणि रेगे हॉस्पिटल अशा नामांकित व मोठ्या रूग्णालयांसह सर्व प्रकारच्या उपचार सुविधा असण्याची प्रदीर्घ परंपरा आहे.
‘रसायनी’ हे इतर उपनगरांपेक्षा वेगळे का आहे?
हे उपनगर भौगोलिकदृष्ट्या नियोजित असे मुंबई, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यामधील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते.
रसायनी या उपनगराची सर्वोत्कृष्ट बाब म्हणजे ते ‘महा मुंबई’त प्रवेश करणारे ठिकाण आहे. भविष्यात या शहरात काही विशेष प्रकल्प उभारले जात आहेत.
सध्य परिस्थितीमध्ये रसायनी ३ ते ६ कि.मी.च्या परिघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करीत आहे. मुख्यत: बिग कोला, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, हिंदुस्तान ऑर्गेनिक केमिकल्स लिमिटेड इत्यादी औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्या या ठिकाणी आहेत. रसायानीमधील ‘पाताल गंगा इंडस्ट्रियल इस्टेट’ देखील एक मुख्य विकसित औद्योगिक वसाहत आहे, ज्यामध्ये कॅस्ट्रॉल, टायटन एशिया अमिसन प्रायव्हेट लिमिटेड, सिप्ला, बॉम्बे डाईंग, आणि हिंदुस्तान इनसेक्टीसाइड्स लिमिटेड सारख्या अनेक कंपन्या आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांतर्फे ‘रसायनी’ उपनगराच्या रहिवासी विकासासाठी, ‘शहरी विकास नियोजनाची’ अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. भविष्यात येथे प्रचंड प्रमाणावर होणार्या विकासाचा एक मोठा भाग म्हणजे ‘ट्रान्सहार्बर सी लिंक’, जो रसायनीपासून फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.
‘रसायनी’ हे ठिकाण, रसायनिक कंपन्या तसेच इतर औद्योगिकरणाने सामावलेले असून देखील, येथून वाहणारी ‘पाताळगंगा नदी’ हि कायम प्रदूषण विरहित असते. येथील वातावरण आणि हवासुद्धा तेवढीच प्रदूषणविरहित व शुद्ध आहे. याचे कारण म्हणजे, येथील औद्योगिक आणि रहिवासी विकसित जागांमध्ये एकमेकांपासून ठराविकरित्या अंतरावर विरहित ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे येथील रहिवासी लोकांना कंपन्यांच्या साहजिक प्रदूषणाचा त्रास देखील होऊ नये. प्रदूषित पाणी अथवा हवा प्रदूषित करणे याबाबतीत, येथील सर्व औद्योगिक आणि रासायनिक कंपन्यांना तसे बंधनकारक नियम लादण्यात आले आहेत. तसे चुकून देखील काही घडल्यास कंपन्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाते. दैनंदिन जीवनासाठी लागणारं पाणीसुद्धा इथे शुद्ध प्रतीचं व मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
नवी मुंबई, पनवेलमधील ‘रसायनी’ हे एक अत्यंत विकसनशील आणि नैसर्गिक सुफलता प्राप्त असे ठिकाण आहे. या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीमध्ये भविष्यात उच्च प्रतीचा मोबदला मिळू शकतो. त्यामुळे ‘रसायनी’ सारख्या ठिकाणी मालमता गुंतवणूक करणे म्हणजे घर खरेदीदार तसेच रिअल इस्टेट गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी म्हणता येईल.
Your Name
Your Email
Your Phone No.
Subject